लोकशाहीच्या चौकटीत राहूनच आंदोलन करावे

मंचर- लोकशाही मार्गाने मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; परंतु काही समाजकंटक मोर्चा किंवा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पर्यायाने प्रशासन म्हणून कायदेशीर कारवाईचा बडगा उचलावा लागतो, त्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकशाहीने दिलेल्या अधिकाराच्या चौकटीत राहूनच आंदोलन करावे. प्रशासनाला सहकार्य करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी केले.
मराठा सकल बांधवांनी 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्या पार्श्‍वभूमीवर मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीच्या माध्यमातून मंचर ग्रामंपचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला आलेल्या विविध जातीधर्माच्या बांधवांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव बोलत होते. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, ऍड. सुनील बांगर, भाजपचे अध्यक्ष संजय थोरात, अजय घुले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, युवराज बाणखेले, मंचर शहर शांतता समितीचे उपाध्यक्ष प्रवीण मोरडे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार, कामगार नेते ऍड. बाळासाहेब बाणखेले, सागर काजळे, योगेश बाणखेले, कैलास बाणखेले, बाजीराव मोरडे, सोमनाथ खुडे, बाबाजी चासकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
मराठा सकल समाजाच्या बांधवांनी 9 ऑगस्टला प्रशासनाला सहकार्य करावे. मोर्चामध्ये काही समाजकंटक सहभागी होऊन मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील. यावर पोलिसांची करडी नजर आहे. सयोजकांनी बाहेरील व्यक्तीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी केले. ऍड. सुनील बांगर यावेळी म्हणाले की, पोलिसांनी कार्यकर्त्याना आगाऊ नोटिसा देऊ नये. शांतता मार्गाने होणाऱ्या मोर्चाला प्रशासनाने सहकार्य करावे. उगीचच कारवाईचा बडगा उचलून विनाकारण वातावरण दूषित करू नये.
सरंपच दत्ता गांजाळे यांनी मराठा मोर्चा शांततेने होण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. भाजपचे तालुका अध्यक्ष संजय थोरात यांनी आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने कार्यवाही चालू आहे. सर्वानी संयम राखावा, असे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)