लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अबाधित राहण्यासाठी पारदर्शकता हवी : जाधव

सातारा – पत्रकारांनी वास्तवाचे भान राखावे, निरर्थक वेठीस धरू नये. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अबाधित राखाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेद पत्रकारांनी करू नये.तेव्हा पत्रकारांनी लेखन करताना पारदर्शकता ठेवून वाटचाल करावी. असे वक्‍तव्य सुरेश जाधव यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुंभरोशी, ता. महाबळेश्‍वर येथे चर्चासत्रात जाधव यांनी विचार मांडले.

यावेळी माजी सरपंच तथा रामवरदायिनी सोसायटीचे चेअरमन विजयकुमार हवालदार चर्मोद्योग महासंघाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. कारंडे व तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अनिल वीर उपस्थित होते. जाधव म्हणाले, कोणत्याही ठिकाणी अडथळा येता कामा नये. सर्वाना हवेहवेसे काम झाले पाहिजे. त्यामुळे लेखणीचा वापर हा आक्रमक व विघातक होता कामा नये. हवालदार म्हणाले, पत्रकारितामुळे समस्यांचे निराकरण होत असते. मात्र, पत्रकारांना सत्य माहिती लोकांनी सांगावी.

-Ads-

कारंडे यांनी नेहमीच्या शैलीने पत्रकार हा विधायक कार्य करीत असल्याचे स्पष्ट केले. पत्रकार आहे म्हणून ग्रामीण भागातील अडीअडचणी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असल्याचेही त्यांनी सांगितले. अनिल वीर यांनीही आपल्या वर्षातील लेखणीबद्धल भाष्य केले. जरी तो एका विचाराने समाजात वावरत असेल तरीही त्याने समानतेच्या तत्वाने न्याय व कायदा याचा आधार घेऊन काम करावे. अनिरुद्ध वीर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)