लोकलने उडवल्याने तरुणाचा मृत्यू

देहुरोड – भेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्ग ओलांडत असताना भरधाव लोकलने उडवल्याने तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. 23) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.

मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली नसून वय अंदाजे 25 वर्षे आहे. लोहमार्ग ओलांडत असताना लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर समोरच्या बाजूला ओम साई राम तर डाव्या हाताचा अंगठा व तर्जनी याच्या मध्ये इंग्रजीमध्ये आर असे गोंदले आहे.

-Ads-

अंगाने सडपातळ, वर्ण गोरा, उंची 5 फूट 8 इंच, केस वाढलेले काळे, दाढी-मिशी बारीक असे वर्णन आहे. अंगात राखाडी रंगाचे पावसाळी जॅकेट, राखाडी हाल्फ शर्ट व फिकट निळ्या रंगाची जीन्स असे कपडे होते. या वर्णनाच्या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास देहुरोड लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)