लोकमान्य रुग्णालयात वेतनवाढ करार

पिंपरी – निगडी येथील लोकमान्य रुग्णालय व्यवस्थापन आणि राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांच्यात वेतनवाढ करार पार पडला. त्यानुसार कामगारांना दहा हजार रुपयांची वाढ मिळाली आहे.

लोकमान्य रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य, सुनील काळे, जनसंपर्क प्रमुख डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या समवेत राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भोसले व रुग्णालयातील कामगार प्रतिनिधींनी वाटाघाटी केल्या. नोव्हेंबर 2018 ते ऑक्‍टोबर 2021 या तीन वर्षाकरिता थेट वेतनात वाढ मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्कम रुपये बाराशे अप्रत्यक्ष वाढ तसेच कर्मचाऱ्यांसाठी एक लाख दहा हजार तर त्यांच्या कुटुंबियांसाठी पंचाहत्तर हजार रुपये वैद्यकीय सेवेसाठी मिळणार आहेत. कामगाराचा अपघात झाल्यास व्यवस्थापन विम्याचे स्वतंत्र प्रयोजन करण्यात येणार आहे. लोकमान्य रुग्णालयातील कामगार प्रतिनिधी विठ्ठल ओझरकर, संजय साळुंखे, सुनील साळे, प्रमोद चव्हाण, नितीन कांबळे, सुजीत कुटे, हनुमंत जाधव, जाकीर मुलाणी, नवनाथ जगताप, सरस्वती शेलार, सारीका राऊत आदी वेतनवाढीच्या झालेल्या वाटाघाटीत सहभागी होते.

या कराराचा लाभ 200 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय मदतनीस व सफाई कर्मचारी तसेच तातडीचे वैद्यकीय कर्मचारी यांना थेट हातामध्ये तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे. भंडारा उधळून आणि रुग्णांना फळ वाटप करत कर्मचाऱ्यांनी कराराचा आनंदोत्सव साजरा केला. पिंपरी-चिंचवड शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा हा पहिलाच वेतनकरार असल्याचा दावा यशवंत भोसले यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)