लोकमान्य टिळक शाळेच्या कामाचे भूमिपूजन

पिंपरी – फुगेवाडी येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक रोहीत उर्फ आप्पा काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा धायगुडे-शेडगे, स्वाती उर्फ माई काटे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राउत, कार्यकारी अभियंता संजय घुबे आदी उपस्थित होते. फुगेवाडी येथील अस्तिवात असलेली जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येणाAर आहे.

वाहनतळासह त्यामध्ये तळमजला अधिक 2 मजले असून त्यामध्ये 12 वर्ग खोल्या असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर अध्यापक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अंध व अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. अपंगांसाठी स्वच्छतागृहात युरोपियन प्रकारचे टॉयलेटची सुविधा करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 4 कोटी 62 लाख इतका खर्च येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)