लोकप्रिय कोरियन ग्रूप लुसेंट प्रथमच पुण्यात सादर करणार के-पॉप कार्यक्रम

पुणे: चौथा कोरियन भारतीय सांस्कृतिक महोत्सव रविवारी, २८ ऑक्टोबर २०१८ रोजी बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात सांयकाळी ४ वाजता होणार आहे. इंडो कोरियन कल्चर ग्रूपच्या वतीने पुणे महापालिका, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबईतील कोरियन वकिलातीच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच, कोरियाच्या मुंबईतील दुतावासाचे अधिकारी साँग उन किम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लुसेन्ट हा लोकप्रिय कोरियन कलाकारांचा ग्रूप असून, लक्षवेधी नृत्यातील सहजता आणि हिप-हॉप आणि प्रोग्रेसिव्ह पॉपच्या वेगळ्या रचना यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. कोरियासह जपानमध्ये लोकप्रिय ठरल्यानंतर आता भारतात प्रथम पुण्यात आपली कला सादर करण्यासाठी ते येत आहेत. या ग्रूपमध्ये यू साँग, झी हू, कोगून बाओ, पारखा, हिरो आणि तैजून या लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे. के-पॉप संगीत प्रकारात लोकप्रिय होत असलेला हा ग्रूप जगभर कला सादर करणार आहे. पुण्यात अतुलनीय कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, येथील रसिकांची त्याला दाद मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अण्णाभाऊ साठे सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास मोफत प्रवेश असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. भारतीय आणि कोरियन अशा दोन संस्कृतींना एकत्र आणणारा हा कार्यक्रम म्हणजे कलाप्रेमी पुणेकर रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. कोरियन कलाकार डॉ. उन्जू लिम या त्रिधारा संस्थेतील विद्यार्थ्यांसोबत कथक नृत्य सादर करणार आहेत. मिलिंद दाते यांचे सादरीकरण यावेळी होईल. तसेच, कुक्कीवन हा संघ देणार असलेली तायक्वांदोची प्रात्यक्षिके हेही या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)