लोकप्रतिनिधींशी संवादातून विसर्जन शांततेत होणार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विश्‍वास नागंरे-पाटील, व्यासपिठावर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपअधिक्षक गजानन राजमाने, राजलक्ष्मी शिवणकर, मुख्याधिकारी शंकर गोरे

विश्‍वास नागंरे-पाटील: समाजकंटकांसाठी पोलिसांची भूमिका कडकच
सातारा,दि.18 प्रतिनिधी- पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. समाजातील 99 टक्के लोकांचे पाय धुऊन पाणी प्यायला कमी करणार नाही. मात्र, उर्वरित जे समाजकंटक आहेत त्यांच्यासाठी कायदेशीर दंडुका हा उगारलाच जाईल असा इशारा पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नागंरे-पाटील यांनी दिला. त्याचबरोबर यंदाचे गणेशोत्सव शांततेत पार पडावे यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींशी देखील संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने साताऱ्यातील अलंकार हॉल येथे मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी व संघटना प्रतिनिधींची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपअधिक्षक गजानन राजमाने, राजलक्ष्मी शिवणकर आदी.उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला नरेंद्र पाटील, अविनाश कदम, प्रकाश गवळी, श्रीकांत शेट्ये, सिध्दी पवार, विजय काटवटे यांच्यासह मान्यवरांनी मिरवणूक आणि विसर्जन तळ्या बाबात मते व सूचना व्यक्त केल्या. त्यावर पोलीस प्रशासनाची भूमिका मांडताना नांगरे-पाटील म्हणाले, पोलीस हे जरी अधिकारी असले तरी ते जनतेचे सेवक आहेत. जनतेच्या कराच्या पैशातून आमचे पगार होतात एवढी नम्र भूमिका आमची आहे. त्यामुळे यंदाची गणेश विसर्जन मिरणवूक ही शांततेत व सर्वांना सुरक्षित वाटेल अशा वातावरणात पार पडल्या पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यसाठी आमची लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर यंदाच्या गणेशोत्सवात सातारा जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पोलीस दलाच्या तुकड्या जरी मागविण्यात येणार असल्या तरी कमीत कमी पोलीस बंदोबस्तात विसर्जन मिरवणुका पूर्ण होतील यावर आमचा भर असणार आहे. असे सांगून डॉल्बीबाबत बुधवारी न्यायालयातून निर्णय येणार असल्याचे सांगत त्यांनी डॉल्बीवर भाष्य करणे टाळले. त्याचबरोबर स्पिकरवरून कमीत कमी भक्तीगीते लावण्यावर मंडळांनी भर द्यावा आणि सार्वजनिक गणेशोत्सवातून रचनात्मक कार्य कसे करता येईल यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस अधिक्षक पंकज देशमुख म्हणाले, पोलीस दलाच्यावतीने विसर्जन मिरवणूक मार्गावरील ट्राफीक कंट्रोलिंग हे करण्यात येईल. त्याचबरोबर पोलीस दलावर कोणताही राजकीय दबाव नसून साताऱ्यातील 45 जणांवर कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. प्रस्ताव मंजूर होताच त्यांना सातारा शहरात थांबता येणार नाही याची खबरदारी पोलीस घेणार आहेत, असे ही देशमुख यांनी सांगितले. तर पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी, प्रशासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या तळ्याचे काम अंतिम टप्प्यात असून खोदकाम पूर्ण झालेले असून आता आजपासून तळ्यात पाणी सोडण्यात येणार आहे. तळे दि.21 सप्टेंबरपासून विसर्जनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.

डॉल्बीमुक्तीसाठी रॅली अन्‌ रक्तदान ही..
डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुका व्हाव्यात यासाठी पोलीस दलाच्यावतीने कायदेशीर सर्वोतपरी प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर आता बुधवार दि.19 रोजी सातारा शहरात डॉल्बीमुुक्ती प्रबोधनात्मक रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये विशेषत: विद्यार्थी सहभागी होणार असून राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पंकज देशमुख यांनी केले. तसेच गुरूवारी पोलीस दलाच्यावतीने अलंकार हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे. अधिकाधिक युवक व नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे असे सांगताना सर्व संकल्पना उपअधिक्षक गजानन राजामाने यांची असल्याचे देशमुख यांनी आवर्जुन सांगितले.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)