लोकप्रतिनिधींनी तत्वाने वागायला हवे

आ. निलम गोऱ्हे-विधान परिषद विशेषाधिकार समितीचा दौरा
सातारा-राजशिष्टाचारानुसार सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या. शासकीय होणाऱ्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर राजशिष्टाचाराप्रमाणे लोकप्रतिनधींची नावे टाका,निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडील राजशिष्टाचार विभागाकडून तपासून घ्या, अशा सूचना करत,लोकप्रतिनिधींनीही काही तत्वे आहेत त्याचे पालन करायलाच हवे, असे मत विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. त्या विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी आ. रामराव वडकुते,जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे उपस्थितीत होते. लोकप्रतिनिधी हे मतदार संघातील विकास कामांबाबत वेळावेळी बैठका घेतात. या बैठकीत अधिकाऱ्यांनी बैठकीच्या अनुषंगाने माहिती तयार करुन लोकप्रतिनीधींना द्यावी. लोकप्रतिनिधींनी फोन केला तर तो अधिकाऱ्यांनी उचललाच पाहिजे. काही कारणास्तव उचलू शकले नाही तर त्यानंतर त्यांना फोन करुन त्यांचे काय काम आहे याची विचारणा करावी. दर महिन्याला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी लोकप्रतिनधींसोबत दोन महिन्यातून एकदा बैठक घ्यावी.

-Ads-

अधिकारी कसा वागतो याचा संदेश जनतेमध्ये जात असतो त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांने राजशिष्टाचाराप्रमाणे लोकप्रतिनिधींना वागणूक द्यावी, अशा सूचनाही प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले. अधिकऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सन्मानाने वागायलाच हवे.प्रत्येक अधिकाऱ्याने राजशिष्टाचार प्रमाणे लोकप्रतिनधींना सौजन्याची वागणूक दिली पाहिजे. त्यांच्या प्रत्येक पत्राला उत्तरे दिली पाहिजेत. जिल्ह्यात घडत असलेल्या प्रत्येक घटनेची माहिती त्यांना द्यावी. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद वाढविला पाहिजे, असे समितीचे सदस्य तथा आमदार रामराव वडकुते यांनी यावेळी सांगितले.

लोकप्रतिनधींचे पत्र कार्यालयांना प्राप्त होतात. त्या पत्रांना मुदतीत उत्तरे द्या. लोकप्रतिनिधींचे फोन उचला त्यांच्या प्रश्नांना नम्रपणे उत्तरे द्या. लोकप्रतिनिधींना राजशिष्टाचाराप्रमाणे सन्मान द्या. लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्यात कमी पडू नका झालेल्या कामांची माहिती त्यांना वेळोवेळी द्या. राजशिष्टाचारनुसार लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना परिपत्रक आणि सूचना पाठवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

लोकप्रतिनिधींनीही अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत का? या प्रश्‍नावर बोलताना त्या म्हणाल्या,जसे अधिकाऱ्यांनी शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींनाही काही तत्वांचे पालन करण्याची गरज आहे. ते त्यांनी करायलाच हवे. समितीच्या आजच्या बैठकीला अनेक लोकप्रतिनिधी गैरहजर असल्याचे निदर्शनास आणताच, बरेच लोकप्रतिनिधी अन्य काही समित्यात असल्याने ते बाहेर असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. रामराजे हे खुप सकारात्मक सभापती आहेत. त्यांचा कोणत्याच गोष्टीत हस्तक्षेप नसतो. जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात प्रथम आल्याने रामराजेंना खुप आनंद झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. यावेळी सातारा जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पहिला आल्याबद्दल त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)