लोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशारा

केंदूर परिसरातील सात गावे आक्रमक ः थिटेवाडी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी

केंदूर-खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना गावबंदी करू, असा इशारा केंदूरच्या थिटेवाडी धरणातील पाणी प्रश्नावर सात गावांच्या प्रतिनिधींनी केंदूरमध्ये बैठक घेऊन दिला आहे.
या विभागाचे खासदार आणि आमदार दोघांचेही आपापसांत चांगले संबंध आहेत आणि हे दोघेही कार्यकर्त्यांची आणि मतदारांची दिशाभूल करीत आहेत, अशा भावना सात गावच्या प्रतिनिधींनी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी प्रत्येक निवडणुकीवर केंदूर ग्रामस्थांनी बहिष्कार घालणार असल्याचे चार दिवसांपूर्वी गावाची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर शेजारील सात गावांच्या प्रतिनिधींनी केंदूर ग्रामस्थांना पाठिंबा दर्शविला आणि तातडीची बैठक घेऊन पंचायत समिती सदस्य ते खासदार या सर्व लोकप्रतिनिधींना जोपर्यंत थिटेवाडी धरणात कलमोडी, डिंभे अथवा चासकमानचे पाणी सोडण्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत गावबंदी करणार असल्याचा इशारा थेट सात गावच्या लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
कठीण असलेले मराठा आरक्षण मुख्यमंत्री मार्गी लावू शकतात तर आमचा थिटेवाडी धरणाचा छोटा प्रश्न आहे, असे मत व्यक्त केले. वेळ पडल्यास आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व राजकीय पदांचा राजीनामा देणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. आता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सात गावांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
कार्यक्रमाला कनेरसर, पूर, वाफगाव, कान्हूर, पाबळ, वरुडे आदी गावचे सरपंच अनुक्रमे सुधीर माशेरे, संपत गावडे, अजय भागवत, दादासाहेब खर्डे, सोपान जाधव, मारुती थिटे आदींसह या गावातील पदाधिकारी, केंदूरचे राजेंद्र ताठे, रामशेठ थिटे, उपसरपंच अभिजित साकोरे, बाबुराव साकोरे, तुकाराम थिटे, सतीश गावडे, तुकाराम सुक्रे, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्यकांत थिटे, जयदीप ताठे, भरत साकोरे, साहेबराव साकोरे आदींनी थिटेवाडी पाणी प्रश्न समिती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)