लोकप्रतिनिधींकडून आवर्तनाची फक्‍त जाहिरातबाजी 

आशुतोष काळे यांची टीका : तातडीने चाऱ्या सोडण्यासाठी प्रयत्न करणार
कोपरगाव – तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधी आवर्तनाच्या घोषणेची केवळ जाहिरातबाजीच करतात. सोडलेले आवर्तन पूर्ण करून घेण्यात तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधी मात्र सपशेल अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे पाण्याअभावी पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे तातडीने चाऱ्या सोडण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्‍यातील सोनेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या 19 लाख रुपये खर्चाच्या नगदवाडी ते आनंदवाडी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ, 36 लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्ष कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब जावळे होते.
आशुतोष काळे म्हणाले, पाटपाण्याचे आवर्तन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींची आहे. अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. आवर्तन सुटून एवढे दिवस झालेत तरी चाऱ्या सुटलेल्या नाहीत. उन्हाची तीव्रता वाढली आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा, चारा पिके, पाण्याअभावी जळून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकण्याचे काम तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधी करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
ग्रामीण भागात आजही विकास कामांचा अनुशेष मोठा असून सर्व ग्रामपंचायतींनी विकास कामांचे प्रस्ताव पाठवावेत. त्या प्रस्तावांचा जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करून ग्रामीण भागाचा कायापालट करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
यावेळी पंचायत समिती सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे, काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, एम. टी. रोहमारे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, उपसरपंच विजय जगताप, शरद पवार पतसंस्थेचे उपाध्यक्ष सोपानराव गुडघे, राहुल रोहमारे, रोहीदास होन, पाराजी होन, केशव जावळे, शंकर चव्हाण, विठ्ठल जावळे, शिवाजी जावळे, कर्णा जाधव, हरिभाऊ जावळे, सुरेश साबळे, नवनाथ माळी, ग्रामविकास अधिकारी जोर्वेकर, कचरू डुबे, किशोर जावळे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक केशव जावळे यांनी केले. किसन जावळे यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)