लोकपाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला पुन्हा नोटीस

नवी दिल्ली: लोकपाल निवड समितीवर कोणाला घ्यायचे हेच अजून ठरलेले नसल्याने केंद्र सरकार मध्ये लोकपालाची नियुक्ती रखडली असल्याचे सांगितले जात असून हा विषय आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत उपस्थित झाला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक नोटीस जारी केली असून त्यात गेल्या सप्टेबंर महिन्यापासून केंद्र सरकारने या संबंधात नेमके काय काम केले अशी विचारणा त्यांना केली आहे. ही माहिती येत्या 17 जानेवारी पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सप्टेंबर 2018 पासून केंद्र सरकारने या संबंधात खूप हालचाली केल्याची मोघम माहिती सरकारच्यावतीने ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी आज सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे दिली त्यावेळी तुम्ही नेमके काय केले आहे याची माहिती आम्हाला प्रतिज्ञापत्राद्वारे द्या असे कोर्टाने त्यांना सुनावले. तुम्ही आत्तापर्यंत जे काही केले आहे त्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे तुम्ही सप्टेंबर नंतर या संबंधात नेमक्‍या काय हालचाली केल्या याची आम्हाला अधिकृत माहिती द्या असे कोर्टाने त्यांना दोनदा सुनावले. निवड समिती नेमण्यास सरकारने नाहक खूप विलंब लावला असल्याची टिपण्णीही कोर्टाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)