लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी सरकारला न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : लोकपाल नियुक्तीसाठी असलेल्या निवड समितीतील प्रख्यात विधिज्ज्ञाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. दरम्यान, लोकपाल निवडीची प्रक्रिया लवकर सुरु करण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले.

अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. दरम्यान, लोकपालच्या नियुक्तीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आली असून यात प्रख्यात विधिज्ज्ञांची नियुक्तीची प्रक्रिया सुरु असल्याचे वेणुगोपाल यांनी न्या. गोगोई यांच्या खंडपीठासमोर सांगितले. केंद्र सरकारची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, सध्या या संदर्भात कुठलेही आदेश देण्याचा आमचा विचार नाही. मात्र, लोकपालच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी. तसेच या प्रकरणी १५ मे रोजी पुढील सुनावणी होईल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)