लोकपाल धरणे आंदोलनाला पक्ष, संघटनांचा पाठिंबा

राजगुरूनगर-समाजसेवक अण्णा हजारे समर्थकांनी राजगुरुनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यापुढे आज (दि. 23) लोकपाल धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात आला.
पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार व्हावा व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा म्हणून राज्यात लोकायुक्त व देशात सक्षम लोकपाल नियुक्ती करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऑगस्ट 2011मध्ये देशपातळीवर दिल्ली येथे मोठे आंदोलन सुरु केले. देशातून त्यांना मोठा पाठींबा देण्यासाठी नागरिक एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राजगुरुनगर येथे लोकपाल धरणे आंदोलन करण्यात आले.
राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या आंदोलनाची सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सुरेश टाकळकर यांनी केले. यावेळी राधेश्‍याम जगताप, प्रकाश पाचारणे, बाळासाहेब चौधरी, सीताराम आरुडे, गोविंदराव बुट्टेपाटील, बाजीराव वाहिले, बाळसाहेब पाचारणे, कुंडलिक कोहिनकर, चंद्रकांत गावडे, गंगाधर जैद, प्रशांत नगरकर उपस्थित होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला. त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, समन्वयक गणेश सांडभोर, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मंगेश सावंत यांच्यासह विविध संस्था संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठींबा दिला. लोकपाल धरणे आंदोलनकर्त्यांच्या मागण्याचे निवेदन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तहसीलदार विठ्ठल जोशी यांना देण्यात आले.

  • या आहेत मागण्या
    सर्व राज्यांमध्ये लोकायुक्त व केंद्रामध्ये सक्षम लोकपालाची तत्काळ नियुकीत करणे, लोकपाल कायदा कमकुवत करणाऱ्या कलम 63 व 44 मधील संशोधन रद्द करावे, शेतमाल उत्पादन खर्चाला दीडपट बाजारभाव मिळावा, निव्वळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व शेतमजूर यांना 60 वर्षे वयानंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, कृषी मूल्य आयोगाला संविधानिक स्थान व संपूर्ण स्यायतत्ता देणे, शेती मालालाचा स्वतंत्र पिक विमा सुरु करावा, मतदान पेपरवर फक्त उमेदवाराचा कलर फोटो असावा कोणतेही चिन्ह नको, मतदान मोजताना एकत्रीकरण मशीनचा वापर करावा, मतदान पत्रिकेवरील नोटा चिन्ह म्हणजे राईट टू रिजेक्‍ट असे समजावे, मतदानापूर्वी मतदारांना दिलेली आश्वासने जे पूर्ण करणार नाहीत, अशा लोकप्रतिनिधींना परत बोलाविण्याचा अधिकार जनतेला मिळावा पाहिजे. आदि मागण्यांसाठी आज देशभर लोकपाल धरणे आंदोलन करण्यात आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)