‘लोकपाल’साठी अण्णांचे बेमुदत उपोषण सुरु ; गिरीश महाजनांचा अपेक्षाभंग

राळेगणसिद्धी – समाजसेवक अण्णा हजारे यांनी  राळेगणसिद्धीमधील यादव बाबा मंदिरात अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले आहे.. लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली, म्हणजे कायदा झाला, असे नाही. या कायद्यास विधानसभेत मान्यता मिळणे गरजेचे आहे. आपण आंदोलनावर ठाम असल्याचे भुमिका त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,  आंदोलन मागे घेण्याची सरकारची विनंती अण्णांनी फेटाळल्यामुळे अण्णांच्या भेटीसाठी निघालेल्या गिरीश महाजनांचा यामुळे अपेक्षाभंग झाला आहे. महाजन हेलिकॉप्टर मधून उतरून जुहू ऐरोड्रोमवरून परतले आहेत. वय आणि तब्येतीचा विचार करता आंदोलन मागे घेण्याची विनंती गिरीश महाजन यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अण्णा हजारे उपोषणावर ठाम ! राज्य सरकारकडून मागणी मान्य झाली म्हणजे कायदा झाला, असे नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)