‘लोकपाल’साठी अण्णांचा एल्गार, आजपासून पुन्हा उपोषण

आज सकाळी दहा वाजता अण्णा हजारे बेमुदत उपोषणास बसणार आहेत

राळेगणसिद्धी – समाजसेवक अण्णा हजारेंची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली असून मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत असणार आहेत. लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा मंजूर करण्यात आली. ज्येष्ठ लोकायुक्त आता मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकणार.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले आहे कि, ‘हे माझं उपोषण कोणत्याही व्यक्ती, पक्षाविरुद्ध नाही. समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी सातत्याने आंदोलन करत आलोय. हे त्याच प्रकारचे आंदोलन आहे.’ तसेच  लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली, म्हणजे कायदा झाला, असे नाही. या कायद्यास विधानसभेत मान्यता मिळणे गरजेचे आहे. आपण आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)