लोकन्यायालयात 714 खटले निकाली

  • बार असोसिएशनचा पुढाकार : 51 लाख 48 हजार रुपये वसूल

पिंपरी – जिल्हा विधीसेवा प्राधिकरण पुणे व पिंपरी-चिंचवड बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी न्यायालयात तसेच आकुर्डी म.न.पा न्यायालयामध्ये महा लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 714 खटेले निकालात काढण्यात आले आहेत.

यामध्ये न्यायालयाच्या एकूण 735 खटल्यापैंकी 316 खटले निकाली काढले. यात 51 लाख 48 हजार 241 रुपये वसूल करण्यात आले. तसेच, 10 हजार 643 दाखलपुर्व खटेल ठेवण्यात आले होते. त्यामधील 396 खटले निकालात काढण्यात आले. यात 5 लाख 3 हजार 740 रुपये वसूल करण्यात आले. असे एकूण 714 खटले यावेळी निकाली निघाले असून, यामध्ये एकूण 56 लाख 51 हजार 984 रुपये वसूल केले गेले आहेत.

यावेळी पिंपरी न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश मे. ए. ए. धुमकेकर, देशमुख व अन्य न्यायाधीश यावेळी उपस्थित होते. तसेच, आकुर्डी न्यायालयामध्ये आर.एम.गनवीर उपस्थीत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. उत्तमराव चिखले व नगसेवक समीर मासुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यायाधीश धुमकेकर यांनी लोकन्यायालयाचे महत्व समजून सांगितले. त्यांनी लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त प्रकरणात सहभागी होऊन जास्तीत-जास्त खटले निकाली काढण्याचेही आवाहनही केले आहे. तर यावेळी न्यायाधिश देशमुख यांनीही लोकन्यायालयामार्फत खटले निकाली निघाल्यामुळे कोर्टाचा भार कमी होतो तसेच पक्षकारांचेही वितुष्ठ संपुन वेळ व पैसा वाचतो त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यावेळी ऍड. सुनिल कड यांनी उपस्थित पक्षकार व वकिलांना मार्गदर्शन केले. तसेच नगरसेवक मासुळकर यांनी सर्वांनी समुपचाराने जास्तीत जास्त खटले निकाली काढण्याचे व विधी सेवा प्राधिकरणमार्फत राबवल्या जाणाऱ्या लोक न्यायालय या संकल्पनेचा जास्तीत-जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले.

यावेळी पिंपरी बारचे अध्यक्ष ऍड. राजेश पुणेकर यांनी पक्षकारांनी लोकन्यायालयामध्ये सहभाग घेल्यामुळे त्यांचा खर्च व वेळ वाचून यामध्ये आरोपीस देखील शिक्षा होत नाही असे सांगितले. या लोकन्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून ऍड. सुनिल कड, ऍड. देवदास कुदळे, ऍड. सुर्या नायर, ऍड. अंतरा देशपांडे, ऍड. किरण सोनवणे, ऍड. फान्सीस भोसले, ऍड. वाजीद पठाण, ऍड. सुषमा नामदास यांनी काम पाहिले. तसेच आकुर्डी न्यायलायचे न्यायाधीश म्हणून ऍड. जयश्री कुटे व ऍड. संगीता कुसाळकर यांनी काम पाहिले. यावेळी न्यायलायच्या कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अड.राजेश पुणेकर, अड. प्रसन्न लोखंडे, ऍड. आतिश लांडगे, ऍड. शशिकांत गावडे, ऍड. गणेश राऊत, ऍड. कांता गोर्डे, ऍड. गणेश शिंदे, ऍड. रवीराज मिरचंदानी, ऍड. सुनिल कडुसकर, ऍड. योगेश थंबा उपस्थित होते. प्रास्ताविक ऍड. कांता गोर्डे यांनी केले, तर आभार ऍड. कालीदास इंगेळे यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)