लोकनेते किसनराव बाणखेले सोसायटीचा सन्मान

मंचर ः लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चांगले कामकाज असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते ढाल आणि पुष्पगुच्छ देउन संस्थेचा सन्मान करण्यात आला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण लोंढे यांनी दिली. पुणे येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची 101वी सर्वसाधारण सभा अल्पबचत भवन येथे पार पडली. त्यामध्ये जिल्हा तालुका पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्यकारी सेवा संस्थेचा उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण लोंढे, उपाध्यक्षा अनिता खानदेशे, बाळासाहेब बाणखेले, जे. के. थोरात, संजय बाणखेले, लक्ष्मण गांजाळे आदी उपस्थित होते. लोकनेते किसनराव बाणखेले मंचर विविध कार्यकारी सेवा सोसायटी 60 वर्षे कार्यरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)