लोकनेता, सार्वजनिक जीवनातील बुजूर्ग हरपला

नवी दिल्ली – तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करूणानिधी यांच्या रूपाने लोकनेता, सार्वजनिक बुजूर्ग हरपला, अशा शब्दांत राजकीय नेत्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

करूणानिधी हे सार्वजनिक जीवनातील एक दिग्गज व्यक्तिमत्व होते. तामीळनाडूबरोबरच देशाच्या विकासात त्यांनी योगदान दिले. त्यांच्यासारख्या संपन्न व्यक्तिमत्वाच्या जाण्याने देश गरीब बनल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. तर द्रमुकचे प्रमुख आपल्या देशातील उल्लेखनीय नेत्यांपैकी एक होते. प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला, असे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करूणानिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (बुधवार) चेन्नईला जाणार आहेत. करूणानिधी यांच्याशी मी अनेकदा संवाद साधला. त्यांच्या निधनाने मला अतीव दु:ख झाले आहे. देशाच्या अतिशय ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असणाऱ्या करूणानिधी यांनी नेहमीच प्रादेशिक आकांक्षा आणि देशाच्या प्रगतीला महत्व दिले, अशा शब्दांत मोदींनी आदरांजली वाहिली.

करूणानिधी यांच्या जाण्याने देश एका महान पुत्राला मुकला आहे. तब्बल सहा दशके त्यांनी तामीळ राजकारणाचे व्यासपीठ व्यापून टाकले, अशी भावना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली. राहुलही उद्या चेन्नईला जाऊन करूणानिधी यांचे अंत्यदर्शन घेणार आहेत.

करूणानिधी यांचा जीवनप्रवास अतिशय लक्षणीय होता. देशात लादण्यात आलेल्या आणीबाणीवेळी त्यांनी दिलेला लढा अविस्मरणीय होता, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले. राजकारणात सक्रिय झालेले तामीळ सुपरस्टार रजनीकांत यांनी करूणानिधी यांचे निधन म्हणजे माझ्या जीवनातील सर्वांत दु:ख दिवस असल्याची भावना व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)