लोकनृत्य प्रकारात दहिवडी कॉलेज प्रथम

पुसेगाव ः युवा महोत्सवात सादर करण्यात आलेल्या समूह नृत्यातील एक क्षण. (छाया : प्रकाश राजेघाटगे)

पुसेगावच्या युवा महोत्सवात विविध नृत्य प्रकारांनी रसिक मंत्रमुग्ध

पुसेगाव, दि. 8 (वार्ताहर) – श्रीसेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त श्रीसेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सामुहिक लोकनृत्य प्रकारात दहिवडी कॉलेज दहिवडी प्रथम क्रमांक पटकावला. रेकॉर्ड डान्स प्रकारात डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव, पथनाट्य प्रकारात विलास झोलेपाटील युवा मंच बेळगाव, समूहगीत प्रकारात कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव तर सुगम गायन प्रकारात युवा कलारंग येणपे, ता. कराड सर्वोत्कृष्ट ठरले.
सातारा येथील चिमुकली अंधकलाकार पियुषा सुनिल भोसले हीने संभाजी महाराजांचा रोमहर्षक पोवाडा सादर केला. अपंग कलाकार संभाजी यादव यांच्या हास्य दरबारने रसिकांची पुरेवाट लावली. या युवा महोत्सवात जिल्ह्यातील तीस महाविद्यालयांनी सहभाग घेतला. कॉलेजमधील तरुणाईने देहभान हरपून टाकणाऱ्या नृत्यप्रकारांनी रसिकांना जागेवर खिळवून ठेवले. ठेका धरायला लावणारी गीते व लोकनृत्यांना रसिकांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतले. यावेळी विविध महाविद्यालयांतर्फे सुगम गायन, समूहगीत, पथनाट्य व लोकनृत्याचे प्रकार सादर करण्यात आले. सुगमगायन प्रकारातील विजेते संघ पुढील प्रमाणे- प्रथम- युवा कलारंग येणपे, ता. कराड, द्वितीय – कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, तृतीय-दहिवडी कॉलेज दहिवडी, लोकनृत्य प्रकारातील विजेते ः प्रथम – दहिवडी कॉलेज दहिवडी, समूह गीत प्रकारातील विजेते ः प्रथम-कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव, द्वितीय- डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव, तृतीय- मुधोजी कॉलेज फलटण, उत्तेजनार्थ-युवा कलारंग येणपे व हनुमानगिरी ज्युनिअर कॉलेज पुसेगाव, पथनाट्य प्रकारातील विजेते ः प्रथम- विलास झोलेपाटील युवा मंच बेळगाव, द्वितीय-अरविंद गवळी इंजिनीअरींग कॉलेज सातारा, तृतीय- डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव, उत्तेजनार्थ- प्रबोधन पर्व-एक सुरलात ग्रुप सातारा, डॉ. युनूस शेख, डॉ. संजय सरगडे, डॉ. टी. पी. शिंदे, प्रा. सुरेश देशमुख, प्रा. मुजावर यांनी या स्पर्धांचे परीक्षण केले. लोकनृत्य प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना बारा हजार, आठ हजार, सहा हजार रुपयांची बक्षिसे, पथनाट्य व समूहगान प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे साडे आठ हजार, साडे सहा हजार व साडे चार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. सुगम गायन प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सहा हजार, चार हजार व तीन हजार रुपयांची बक्षिसे तसेच सर्व प्रतारातील विजेत्यांना प्रशस्तीपत्रे, व स्मृतीचिन्हे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, प्राचार्य डॉ.संजय कांबळे, प्राचार्य डी. पी. शिंदे, मुख्याध्यापक संध्या चौगुले, प्रा. संजय क्षिरसागर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)