लोंबकणाऱ्या तारा शेतकऱ्यांच्या जीवावर

  • गोतोंडी, शेळगाव भागातील स्थिती : महावितरणचा कानाडोळा

निमगाव केतकी – इंदापूर तालुक्‍यातील गोतोंडी, शेळगाव, शिरसटवाडी, हगारेवाडी, पिटकेश्वर, व्याहाळी,कडबनवाडीसह अन्य गावामध्ये वाड्यावस्तीवर तसेच शेतामध्ये विद्युतपुरवठा करणारे काही विद्युत पोल वाकलेले आहेत. याशिवाय विद्युत वाहक तारा ही अनेक ठिकाणी लोबकळलेल्या स्थितीत आहेत. या वाकलेल्या विद्युत खांबामुळे व लोबकळ्णाऱ्या विद्युत वाहक तारामुळे नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. महावितरण विभागाकडे वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करूनही महावितरण विभाग या जीवघेण्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप या भागातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केला आहे. म्हणून महावितरण विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या भागातील वाकलेले विजेचे खांब सरळ करावेत व लोबकळ्णाऱ्या विजेच्या तारा आवळून घेण्यात यावेत, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय या भागातील अनेक ठिकाणी झाड्यामधुन विजेच्या तारा गेलेल्या आहेत. ताराचा झाडाना वारंवार स्पर्श होऊन शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या धोका निर्माण होत आहे. वारंवार रोहीत्र बंद पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा वीज प्रवाह खंडीत होतात. पर्यायाने वीज कमी मिळते. म्हणून महावितरण कंपनीने त्वरित दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेळगाव येथील तेलओढा येथील दादाराम भोंग यांच्या डाळींब शेतामध्ये डाळींबीच्या झाडाना विजेच्या ताराचा स्पर्श झाला आहे. शेतामध्ये काम करण्यासाठी भीतीपोटी मजूर मिळत नाहीत. आम्हाला जीव मुठीत धरून डाळींब शेतात काम करावे लागते. तरी महावितरण कंपनीने त्वरित आमच्या डाळींब शेतातील व अन्य भागातील लोबकळणाऱ्या तारा आवळून घ्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा भोंग यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)