लोंढेमळ्यात चोरट्यांचा धुमाकुळ

2 लाख 88 हजार रुपयांची चोरी

मंचर- मंचर येथील लोंढेमळ्यात अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी धुमाकुळ घालत बंद बंगल्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण 2 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) पहाटे घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत.
मंचर-जुना चांडोली रस्त्यावर सेवानिवृत्त अधिकारी सुभाष रामचंद्र लोंढे यांचा बंगला आहे. बुधवारी (दि. 21) दुपारी सुभाष लोंढे, त्यांची पत्नी उज्वला व मुलगी पुनम असे तिघेजण औरंगाबाद येथे सहलीसाठी गेले होते. तेथून देवगड येथे पोहचले असता गुरुवारी (दि. 22) सकाळी 7 वाजता सुभाष यांचे मोठा भाऊ भास्कर लोंढे यांनी फोन करुन बंगल्यात चोरी झाली असल्याची माहिती दिली. चोरट्यांनी बंगल्याचे सेफ्टी लॉक तोडले होते. आतील दरवाजा तोडुन चोरट्यांनी कपाट आणि कपडे अस्ताव्यस्त करुन 12 तोळ्याचे मंगळसूत्र, 11 हजार रुपये रोख, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकुण 2 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सुभाष लोंढे यांच्या बंगल्याला कोरियन बनावटीचे दरवाजाला दहा लॉक असताना ही चोरट्यांनी चोरी केल्याने पोलिसांसह ग्रामस्थांनीही आश्‍चर्य व्यक्त केले आहे. फ्रिजमधील श्रीखंड आणि कपाटातील ड्रायफुड्‌सवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
अनुसया सीताराम थोरात यांच्या घरात घरफोडी केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी 2 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या कानातील कुड्या नेल्या आहेत. घटनास्थळी गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलीस अधिकारी रवींद्र मांजरे यांनी भेट देऊन पाहणी केली. खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी घटनास्थळी पाहणी करुन तपासाच्या दृष्टीने पोलिसांना सूचना केल्या आहेत. पुणे येथून श्‍वानपथक आणि ठसे तज्ञ आले होते. ठसेतज्ञांनी ठसे घेतले असून श्‍वान दुर्गा हिला चोरट्यांचा माग काढण्यासाठी चोरट्यांकडील कोणतेही साहित्य न मिळाल्याने माग निघाला नाही, अशी माहिती श्‍वानपथक प्रमुख गणेश फापाळे, एस. डी. रोकडे यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे फौजदार सोमनाथ पांचाळ करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)