लोंढेमळा ग्रामस्थांतर्फे शाळेला टीव्ही, वायफाय

मंचर -लोंढेमळा-मंचर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पालकांनी व ग्रामस्थांनी तब्बल पावणेदोन लाख रूपये खर्च करून शाळेतील प्रत्येक वर्गात 40 इंची एलईडी टीव्ही, वायफाय सुविधेसह उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येथील शाळा सर्वगुणसंपन्न झाली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले, उद्योजक व मंचर रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्रशांत अभंग, लाला बॅंकेचे अध्यक्ष प्रल्हाद बाणखेले, उपसरपंच महेश थोरात, आशा शेंगाळे, ग्रामपंचायत सदस्य अश्‍विनी शेटे, मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत बाणखेले, प्रवीण मोरडे, संदीप थोरात, अंजना भवारी, गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन, विस्तार अधिकारी रामदास पालेकर, संचिता अभंग, सचिव रूपेश बढे, संतोष बाणखेले, बाजीराव मोरडे, बी. एल. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांची शिस्त व शालेय परिसराची स्वच्छता पाहुन पंचायत समितीच्या सभापती कानडे यांनी कौतुक केले. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरावरील गुणवत्ताधारक 46 विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना शालेय व्यवस्थापन समिती लोंढेमळा यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रोहिणी वायाळ यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था मीरा शेटे, ज्योती मोढवे, उज्वला खानदेशे यांनी पाहिली. सूत्रसंचालन मनोहर वायकर यांनी केले. तर संजय कराळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)