लॉर्डसवर शतक झळकविण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न – वोक्‍स 

लंडन: जायबंदी असल्या कारणाने अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या आणि संघात सहभागी होण्याच्या संधीची वात पहाणाऱ्या ख्रीस वोक्‍सने भारता विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आपल्याला मिळालेल्या संधीत आपले कसोटी कारर्किर्दीतील पहिले वाहिले शतक झळकावत त्या संधीचे सोने केले.
सामण्यानंतर पत्रकारांसोबत बोलत असताना वोक्‍सने सांगितले की, लॉर्डसच्या मैदानावर शतक झळकावीने हे इंग्लंड मधिल प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला खुप नशीबवान समजतो. त्यातच मी हे शतक संघाला सर्वात जास्त गरज असताना झळकवल्याने या शतकाचा आनंद हा काही वेगळाच असल्याचेही त्याने या वेळी सांगितले.
नुकताच वडील झालेल्या वोक्‍सला त्याच्या सहकाऱ्यांनी शतकानंतर बेबी सेलीब्रेशन करावयास सांगितले होते. मात्र शतक झळकविल्यानंतर कश्‍या प्रकारे आनंद व्यक्त करायचा हे सुचत नसल्याने मी हे सेलिब्रेशन करु शकलो नाही असे त्याने यावेळी सांगितले. तसेच संघातील सहकाऱ्यांनी मला का सेलिब्रेशन केले नाही असे विचारले मात्र मला त्यावेळी काहीच सुचत नव्हते तुम्ही जेंव्हा शतका नंतर तुमची बॅट हवेत झळकवता आणि तेही लॉर्ड्स सारख्या मैदानावर तुम्ही ही खेळी करता तेंव्हा तुमच्या अंगावर शहारे उभारतात अश्‍या परिस्थीतीत तुम्हाला काहीच सुचत नाही त्यामुळे ते सेलिब्रेशन करु शकलो नाही असेही त्याने सांगितले.
दरम्यान वोक्‍सला मिळालेल्या संधीचा त्याने या कसोटीत पुरेपूर फायदा करुन घेतला. भारताच्या फलंदाजीच्या वेळी त्याने कर्णधार विराट कोहली बाद केले तर खेळपट्टीवर स्थिराऊ पहाणाऱ्या हार्दीक पांड्यालाही बाद करत त्याने गोलंदाजीत आपली धार दाखवताना फलंदाजीत नाबाद 137 धावांची खेळी करत इंग्लंडला पहिल्या डावात भारतावर 289 धावांची आघाडी मिळवून दिली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)