लॉर्डसच्या ऑनर बोर्डावर ख्रिस वोक्‍सचे नाव 

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत 4 बाद 89 अशा अवस्थेत सापडलेल्या इंग्लंड संघासाठी जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्‍स ही जोडी धावून आली. त्यांनी तुफान खेळी करताना लॉर्डस कसोटीत भारताच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. बेअरस्टोचे शतक सात धावांनी हुकले असले तरी ती कसर वोक्‍सने भरून काढली. वोक्‍सने कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले आणि लॉर्डसच्या ऑनर बोर्डावर स्वतःचे नाव नोंदवले.
गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाडीवर लॉर्डस ऑनर बोर्डावर नाव नोंदवणारा वोक्‍स दहावा खेळाडू ठरला. लॉर्डसवर शतक आणि पाच विकेट घेण्याचा पराक्रम करणारा वोक्‍स दहावा खेळाडू ठरला. इंग्लंडच्या सात खेळाडूना अशी कामगिरी करता आली आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध लॉर्डस येथे झालेल्या कसोटीत त्याने दोन्ही डावांत प्रत्येकी पाच विकेट घेतल्या होत्या. नऊ कसोटी सामन्यांत असे विक्रम नोंदवले गेले,तर सर गॅरी सोबर्स यांनी जागतिक एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना इंग्लंडविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.
लॉर्डसवर दहा विकेट आणि शतक झळकावणारा तो पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी हा विक्रम गब्बी लन, कैथ मिलर, इयान बोथम आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या नावे आहे. पाच विकेट आणि शतक या विक्रमात त्याने अँड्य्रू फ्लिंटॉफ, रे इलिंग्वर्थ, कैथ मिलर, बेन स्टोक्‍स आणि विनू मंकड यांच्याशी बरोबरी केली. लॉर्डसच्या खेळपट्टीवर वोक्‍सने नेहमीच कमाल केली आहे. फलंदाजीत त्याने शंभरहून अधिक सरासरीने धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत दहापेक्षा कमी सरासरी ठेवली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. येथे खेळलेल्या तीन सामन्यांत त्याने 122च्या सरासरीने 244 धावा केल्या आहेत आणि 9.33 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या आहेत.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)