लॉन टेनिस स्पर्धेत आत्मा लॉन टेनिस स्पर्धेत आत्मा

कोपरगाव,(प्रतिनिधी) – अहमदनगर क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेत आत्मा मालिकच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विभागस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळविला.
विभागीय स्पर्धेसाठी ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम गुरुकुलच्या 14 वर्षे गटात यश फटांगरे, 17 वर्षे गटात शुभम गिरी, तर 19 वर्षे गटात प्रतीक शिरसाठ यांची निवड झाली. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक शाहरूख शेख, करुणा धेंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रमाचे संत देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्‍वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख, प्रकाश भट, बाळासाहेब गोरडे, प्रकाश भट, प्राचार्य माणिक जाधव, नितीन सोनवणे, क्रीडा विभागप्रमुख अशोक कांगणे, अजित पवार, सुरेश शिंदे, गणेश म्हस्के, आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)