लॉटरी सेंटर चालकाला धमकी

पिंपरी – लॉटरी विक्रीच्या कारणावरून तीन जणांनी लॉटरी सेंटरमध्ये घुसून चालकाला धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 31) सायंकाळी भूमकर चौक, वाकड येथे घडली.

पंकज भारत जगताप (वय-30, रा. ताथवडे रोड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीन अनोळखी व्यक्‍तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांचे वाकडच्या भूमकर चौकात जगताप लॉटरी सेंटर नावाचे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ते दुकानात असताना तोंडावर रुमाल बांधलेले तिघेजण आले. लॉटरी विक्रीच्या कारणावरून बाचाबाची करून शिवीगाळही केली. तसेच हल्ला करून दुखापत करण्याची धमकी दिली. सहायक निरीक्षक नकुल न्यामणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)