लॉटरीचे आमिष; फसवणूक करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे- ई – मेलच्या माध्यमातून तुम्हाला 1 कोटी 70 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून तब्बल 16 लाख 32 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नमोए ओमोरूई (38, महावीरनगर, तिलकनगर, जनकपुरी इस्ट, नवी दिल्ली) याला दिल्ली येथे अटक करून तेथील स्थानिक न्यायालयातून प्रवासी कोठडी घेऊन त्याला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. याबाबत कसबा पेठेतील 48 वर्षीय महिलेने फरासखाना पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणात पोलीस प्रतीक, अनिला, डॉ. रॉबर्ट म्युलर यांचा शोध घेत आहे. दि. 11 एप्रिल ते 29 मे 2018 दरम्यान आरोपींनी ईमेलद्वारे लव्हाटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना 1 कोटी 70 लाखांची लॉटरी लागल्याबाबत ई- मेल पाठविला. ही रक्‍कम प्राप्त करण्यासाठी आरोपींनी विविध बॅंकेच्या खात्यावर 16 लाख 32 हजार रुपये भरण्यास सांगून लॉटरीची रक्‍कम न देता फसवणूक केली. गुन्ह्यतील अटक आरोपी नमोए याने डॉ. पॉल नेलसन या खोट्या नावाने मोबाईल फोन करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या ताब्यातून दिल्ली येथून 5 मोबाईल हॅन्डसेट, दोन डोंगल, दोन लॅपटॉप, जप्त करण्यात आले आहे. ज्या बॅंकेत रक्‍कम भरण्यास सांगितले आहे. त्या बॅंक खात्यातून रक्‍कम काढली आहे. ती रक्‍कम जप्त करायची आहे. डॉ. रॉबर्ट म्युलर कोठे राहण्यास आहे. फियार्दींच्या नावाने रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड या बॅंकचे बनावट मास्टर कार्ड कुरिअरने पाठविले आहे. ते कार्ड बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून ते कार्ड कोठे बनविले याचा तपास करायचा असल्याने सरकारी वकील वैभाव घुमटकर यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संभाजी शिर्के करित आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)