लॉटरीचे आमिष दाखवून महिलेची साडेसोळा लाखांची फसवणूक

पुणे, दि. 4 – मोबाइल नंबरला 1 कोटी 70 लाखाची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका ग्राफिक डिझायनर महिलेची 16 लाख 32 हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वैशाली लव्हाटे (48, रा. कसबा पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वैशाली लव्हाटे यांच्या मोबाइलवर 11 एप्रिल 2018 रोजी अज्ञात मोबाईल धारकाने कॉल करून तुमच्या मोबाइल नंबरला 1 कोटी 70 लाखाची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्‍वास बसावा यासाठी त्यांना ई-मेलवर काही डिटेल्सही पाठवण्यात आले. यानंतर बक्षिसाची रक्‍कम मिळण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या बॅंक खात्यावर 16 लाख 32 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. 29 मे 2018 पर्यंत त्यांनी आमिषाला भुलून पैसे भरले. मात्र, यानंतरही त्यांना कोणत्याच प्रकारची लॉटरीची रक्‍कम मिळाली नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फरासखाना पोलिसांकडे धाव घेतली.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी सांगितले, फिर्यादी एका खासगी कंपनीत ग्राफिक डिझायनरचे काम करते. त्यांना मोबाईलवर लॉटरी लागल्याचा मेसेज आला होता. फिर्यादींना डॉ. पॉल नेलसन नावाच्या व्यक्तीने कॉल केला होता. त्याने ई-मेलवर लिंक पाठवून बॅंकेच्या खात्याची माहिती विचारली होती. त्यांनी ती माहिती भरल्यावर त्यांना ऑनलाईन बॅंकेच्या खात्यावर पैसे वर्ग होताना दिसत होते. 40 टक्‍के रक्‍कम भरल्याचे दाखवले गेल्यावर टॅक्‍स कोडची विचारणा करण्यात आली. यानंतर फिर्यादीने डॉ. पॉलला फोन करून टॅक्‍स कोड विचारल्यावर 40 टक्‍के नंतर रक्‍कम भरल्याचे दाखवत नसल्याचे सांगितले, यावर डॉ. पॉलने 45 हजार टॅक्‍स एका खात्यावर भरण्यास सांगितला. यानंरत त्यांना परत बॅंकेच्या खात्यावर रक्‍कम वर्ग होताना दिसली, यामुळे त्यांचा आरोपीवरील विश्‍वास पटत गेला. यानंतर त्यांना एका वेबसाईटरव बॅंकेचा कोड भरण्यास सांगण्यात आले. तो भरल्यावर फिर्यादीला बॅंक खात्यात 1 कोटी 70 लाख रक्‍कम भरणा झाल्याची दिसली. यानंतर त्यांना विविध नावाने फोन करून बॅंक अकाऊंट अपडेट करण्यासाठी सांगितले. तसेच युके गव्हरमेंटचा ई-मेल पाठवून ऍन्टी टेररीस्ट प्रमाणपत्रासाठी रक्‍कम आरटीजीएसद्वारे भरण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर त्यांना कॉल करून रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंडचे मास्टर कार्ड कुरियरने येईल, असे सांगितले गेले होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून जाळ्यात अडकवण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)