लॉजवर छापा टाकून दोन मुलींची सुटका

विमाननगर येथील लॉजवर छापा टाकून दोन मुलींची सुटका
लॉज मालकासह तिघे ताब्यात
पुणे,दि.1- विमाननगर येथील लॉजवर छापा टाकून दोन मुलींची वेश्‍याव्यवसायातून सुटका करण्यात आली. याप्रकरणी लॉजमालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले.
लॉजमालक फिरोज मुकेरी, दलाल मिकेशकुमार वसंतभाई लुहार(33,रा.वडगाव शेरी) व कल्पना विकास थोरात (30,रा.केशवनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुटका करण्यात आलेल्या मुली बिहार व उत्तरप्रदेशातील आहेत.
सामाजीक सुरक्षा विभागाला विमाननगर येथील लॉजवर वेश्‍याव्यवसाय सुरु असल्याची खबर मिळाली होती.त्यानूसार लॉजवर छापा टाकून दोन मुलींची सुटका करण्यात आली. यावेळी आरोपींकडून रोख 9 हजार , दोन मोबाईल आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधीत मुलींची महंमदवाडी येथील रेस्क्‍यू होममध्ये रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, पोलीस उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, तुषार आल्हाट, प्रदिप शेलार, राजाराम घोगरे, नामदेव शेलार, रमेश लोहकरे, नितीन तरटे, नितीन तेलंगे, सुनील नाईक, सचिन कदम, रेवनसिध्द नरोटे, राजेंद्र कचरे, गीतांजली जाधव, रुपाली चांदगुडे यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)