लॉजवर छापा टाकून तीन मुलींची सुटका

– सामाजीक सुरक्षा विभागाने लॉजवर छापा टाकून तीन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यातील एका ताब्यात घेण्यात आले आहे.
करण शर्मा, योगी उर्फ मॉन्टी पटेल, दिनेश आणी प्रशांत मच्छिंद्र पाटील यांच्याविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रशांत पाटीलला कारवाईच्या वेळी ताब्यात घेण्यात आले आहे.
सामाजीक सुरक्षा विभागातील पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांना पोलीस नाईक सचिन कदम यांच्याकडून योगी उर्फ मॉन्टी पटेला हा वेगवेगळ्या लॉजेसमध्ये साथीदारांच्या मदतीने रुम बुक करुन परराज्यातील मुलींकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेत असल्याची खबर मिळाली होती. तो हा सर्व प्रकार मोबाईल फोनच्या माध्यमातून करत होता. त्यानूसार सापळा रचून विमाननगर संजय पार्क येथील श्रीकृष्णा लॉजवर छापा टाकण्यात आला. यावेळी दोन सिक्कम व एक दिल्ली राज्यातील अशा तीन मुलींची सुटका करण्यात आली. कारवाईच्या वेळी रोख पाच हजार व तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. या पिडीत मुलींची रेस्क्‍यु फाऊंडेशन येथे रवानगी करण्यात आली. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली..


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)