लॉंग वीकेंडमुळे पुणे-नाशिक महामार्ग “ब्लॉक’

  • राजगुरूनगरातील स्थिती : वाहतूककोंडीने वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

राजगुरुनगर – चैत्र पौर्णिमेला तालुक्‍यात खरपुडी, निमगाव खंडोबा आणि कडधे या ठिकाणी होणाऱ्या खाडोबाच्या यात्रा उत्सव. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या सलग चार दिवस सुट्ट्या यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर आज (शनिवारी) सकाळीपासून मेगाब्लॉक सुरू झाला. त्यातच राजगुरुनगर शहरातील भीम नदीवरील अरुंद पुलावर ट्रक बंद पडल्याने एकेरी वाहतूक सरू झल्याने वाहतुकीचीकोंडी वाढली. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना आज प्रवाशांना करावा लागला.
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथील वाहतूककोंडी नित्याची बनली आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या प्रवासी नागरिकांचे वाहतूक कोंडीमुळे मोठे हाल होत आहेत. त्यातच शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या अरुंद पूल आणि पुढे भीमा नदीवरील पूल आता वाहतूक कोंडीसाठी डोकेदुखी ठरत आहे. याला पर्याय नसल्याने नाईलाजाने तासनतास वाहतूककोंडीत अडकून राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे कोंडीचा प्रश्‍न दिवसेंन्‌दिवस गंभीर होत आहे. आज चैत्र महिन्यातील पौर्णिमा आहे या पौर्णिमेला खेड तालुक्‍यातील कडधे, निमगाव खंडोबा, खरपुडी गाविल खंडोबाची यात्रा आहे याबरोबरच तालुक्‍यात अनेक गावांमध्ये श्री हनुमान जयंती निमित्ताने गावयात्रा आहेत. इतकेच काय तर दहावी बारावीची परीक्षाही संपली आहे. आणि त्यातच गुरुवार (दि. 29) पासून सोमवार (दि. 1 एप्रिल) पर्यंत सलग शासकीय सुट्ट्या आल्याने मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी निघाले आहेत. उन्हाचा पारा वाढला असला, तरीही प्रवाशांच्या संख्येत किंचितशी घट नाही उलट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने शहरात सकाळीपासून झालेल्या वाहतूककोंडीत वाहने अडकून पडल्याने भर उन्हात त्यांना चटके सहन करावे लागले.
राजगुरुनगर येथील अरुंद दोन पूल वाहतूककोंडीला कारणीभूत ठरले आहेत. राजगुरुनगरच्या पुणे आणि मंचरकडून पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण झाले आहे. त्यामुळे सुसाट वेगात वाहने येतात. ही वाहने शहरात प्रवेश करणार तोच दोन अरुंद पूल त्यांना मोठा अडथळा ठरतात. शहरात असलेला अरुंद पूल दोन्ही बाजूकडील वाहतूक कोंडी करतो तर भीमा नदीवरील पुलावर एकेरी वाहतूक असल्याने वाहनाची कोंडी सुटता सुटत नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खेड पोलीस यासाठी प्रयत्न करीत होते, तरीही वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूककोंडी काही केल्या कमी होत नव्हती.

  • वाहनचालकांचा बेशिस्तपणा
    वाहतूककोंडी होवू नये यासाठी पोलीस आणि नागरिकांनी रस्त्यामध्ये दुभाजक केले आहेत मात्र, हे दुभाजक बाजूला करीत वाहनचालक वाहने पुढे नेत वाहतुकीच्या नियम मोडतात. आणि पुढे जातात मात्र, पुढे जाण्याच्या नादात ते वाहतूककोंडीत आणखीन भर टाकतात अन्‌ या कोंडीतच अडकून पडतात व इतरांनाही कोंडीत अडकवून ठेवण्यात कारणीभूत ठरत असून अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
  • स्थानिकांसह, प्रवासी न्यायालयात जाण्याच्या भूमिकेत
    राजगुरुनगर शहरातील पुलाची रुंदी वाढविण्यात येणार असली, तरी या कामाला एक वर्षे लागणार आहे तर राजगुरुनगर बाह्यवळण रस्ता रखडल्याने हा प्रश्‍न दोन वर्षे तरी सुटणार नसल्याने या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल यापेक्षाही वाईट होणार आहेत. याला केवळ शासन जबाबदार असल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवासी आता शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या भूमिकेपर्यंत आले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)