लैंगिक संबंधांवरुन मला धमकावले-अडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्स

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स गर्लफ्रेण्ड आणि अडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्स उर्फ स्टेफनी क्लिफोर्ड हिने पुन्हा गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, लैंगिक संबंधांवरुन मला ट्रम्प यांच्याकडून धमकावल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

“2011 मध्ये मी माझ्या मुलीसोबत फिटनेस क्लाससाठी जात होते. त्यावेळी एक व्यक्ती लास वेगासमधील कार पार्किंगमध्ये भेटला. त्याने मला धमकीच्या सूरात सांगितले की, ‘ट्रम्प यांच्यापासून दूर राहा, आणि जे काही ते विसर.’ त्यानंतर त्याने माझ्या मुलीला पाहून तिचं कौतुकही केल्याचा दावा डेनियल्सने केला आहे.” डेनियल्स पुढे म्हणाली की, “त्याने धमकीच्या सूरातच सांगितले की, जर तिच्या आईसोबत काही झालं, तर ते तिलाही आवडणार नाही. आणि एवढंच बोलून तो तिथून निघून गेला.”

डेनियल्सच्या आरोपांवर व्हाईट हाऊसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. व्हाईट हाऊसचे मुख्य सचिव राज शाह यांनी सांगितलं की, “राष्ट्रपतींनी हे सर्व आरोप यापूर्वीच फेटाळले आहेत.” यापूर्वी जानेवारी महिन्यात डेनियल्सने इनटच नावाच्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीतही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. “2006 मध्ये ट्रम्प यांच्याकडून हॉटेलमध्ये जेवणाचे आमंत्रण देण्यात आलं. मी जेव्हा हॉटेलमध्ये गेली, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हॉटेलच्या रुममध्ये कोचवर बसून टीव्ही पाहात होते. त्यावेळी त्यांनी फक्त पायजमा परिधान केला होता.”

हे प्रकरण दाबण्यासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्या वकील मायकल कोहेन याने आपल्याला एक लाख 30 हजार डॉलरची ऑफरही दिल्याचा दावाही डेनियल्सने केला होता. विशेष म्हणजे, कोहेन यांनीही हे मान्य केलं असून, आपण ही ऑफर कशासाठी दिली होती, याचं कारण मात्र स्पष्ट केलं नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले आपल्याकडे अशा घटना मोठ्या चवीने चघळल्या जातात प्रत्यक्षात अमेरिकेत अशा घटना ह्या सर्वच्यात बाबतीत घडत असतात अप्रत्यक्ष रित्या हे त्यांच्या संस्कृतीलाच धरून असावे परंतु प्रश्न आहे तो अशा प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होईल का ? किंवा अशा प्रकरणामुळे ते राष्ट्ध्यक्ष पदासाठी लायक ठरतात कि नाही ह्यावर चारचा होणे महत्वाचे ठरते त्यासाठी प्रथम ट्रम्प हे व्यवसायिक होते साहजिकच असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात आले असावेत परंतु राजकारणात आल्यावर व त्यातही राष्ट्रद्यक्ष पदावर विराजमान झाल्यावर त्यांच्या कडून अशा घटना घडल्या आहेत का ? अथवा घडत आहेत का ? तसे असेल तर त्यांच्यावर दोषारोप करणे योग्य ठरेल जॉन एफ केनेडी ह्यांच्या मृत्यू नंतर ते पदावर असताना त्यांच्या बाबत अशा घटना घडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या बिल कॅलिंटन हे पदावर असतानाच दोषी ठरविले गेले होते हा फरक गृहीत धरणे महत्वाचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)