लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई

राजगुरुनगर-जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून याबाबतचे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी काढला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये अल्पवयीन वयोगटातील मुली शिक्षण घेत असतात. सर्व शिक्षकांनी अशा मुलींबरोबर पालकत्वाच्या नात्याने वागणे अपेक्षित आहे; परंतु काही शिक्षक या नात्याला काळीमा फासणारी कृत्ये करतात, असे दिसून येत असल्याने अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचे परिपत्रक आज (शनिवारी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहे. काही अल्पवयीन वयोगटातील मुलींना शिक्षकांच्या कृत्याचा मतितार्थ देखील समजत नाही. तर काही मुलींना अशा वर्तनाचा त्रास होऊन देखील लोकलज्जेस्तव त्या बाबींची वाचता करीत नाहीत. काही प्रकरणांमध्ये मुलींनी अशा वर्तनाबाबत तक्रार केली असता शिक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा उलटपक्षी मुलींना समजवण्याचा प्रयत्न करतात. वरील सर्व बाबींमध्ये सदृढ कार्य संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्राथमिक कर्तव्य असल्याने त्याला हानी पोहोचेल अशी कोणतीही बाब अत्यंत काटेकोरपणे हाताळणे आवश्‍यक आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आपण सर्वजण आपल्या मुलींना उत्तम शालेय वातावरण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. जेणेकरून मुली उत्तम शिक्षण घेऊन समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी व्यक्त केला

  • काय म्हटले आहे अध्यादेशात?
    यापुढे कोणत्याही शिक्षकाच्या विरोधात अशा स्वरूपाची तक्रार मुलींनी स्वतः केल्यास त्याची गंभीर दखल संबंधित मुख्याध्यापकांनी घ्यावी. अशा प्रकरणाची प्राथमिक चौकशी त्या शाळेतील महिला शिक्षकांनी तीन दिवसांच्या आत करावी व त्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा. ज्या तक्रारीमध्ये तथ्य दिसून येईल त्या प्रकरणांमध्ये संबंधित शिक्षिका व शिक्षकाविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत व अन्य तरतुदी अंतर्गत तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी करावी. जर संबंधित मुलींनी अशी तक्रार यापूर्वी काही शिक्षिका अथवा शिक्षकांकडे केली असेल व त्या शिक्षिका व शिक्षकांनी याबाबत अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केला नसेल त्यांनादेखील सहआरोपी करण्यात यावे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)