लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुलांनाही मुलींप्रमाणेच नुकसान भरपाई

र्केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सुचवली कायद्यात दुरूस्ती
नवी दिल्ली – लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना ज्या प्रमाणात नुकसानभरपाई दिली जाते तशाच प्रकारे मुलांवरही होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात त्या मुलांनाही तशाच प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी मांडला आहे. लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या मुलांचाही शोध घेऊन त्या विषयी अहवाल तयार करण्यास त्यांनी सांगितले आहे.

या प्रकरणी बोलताना त्यांनी सांगितले की लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार होत असतात आणि त्यातून त्यांना जो मानसिक धक्का बसतो त्यातून ही मुले काही वेळा जन्मभर सावरू शकत नाहीत आणि ती आयुष्यभर अबोलच राहात असतात हा भयानक प्रकार असून त्यांनाही न्याय देण्याची गरज आहे. या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना आपण बालहक्क संरक्षण आयोगाला केली होती. त्यांच्या सुचनेनुसार चाईल्ड सेक्‍शुअल ऍब्युस ऍक्‍ट मध्ये योग्य ती दुरस्ती करून मुलांनाही आता लैंगिक अत्याचार प्रकरणात नुकसानभरपाई देण्याची तरतूद केली जात आहे असेही त्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)