लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली जेएनयु प्राध्यापकाला अटक

नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील काही विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून विद्यापिठातील एका प्राध्यापकास अटक करण्यात आली आहे. अतुल जोहरी असे या प्राध्यापकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जोहरी याच्या अटकेच्या वृत्ताला नवी दिल्ली विभागाचे सहआयुक्‍त अजय चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. जोहरी याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

जैव विज्ञान विभागातील प्राध्यापक असलेल्या जोहरी याच्यावर काही विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचा आरोप केल्यापासून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी विद्यापिठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि महिला हक्क विषयक संघटनांकडून आंदोलन केले जात होते. त्याच्याविरोधात एकूण 8 विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यापैकी एकीच्या तक्रारीच्या आधारे जोहरीविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी जेएनयुतील विद्यार्थ्यांनी वसंत कुंज पोलिस ठाण्याबाहेर निदर्शनेही केली होती. या निदर्शनांमध्ये ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन्स असोसिएशन आणि ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संघटना या संघटना सहभागी झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)