लेथ मशीनचे बारा लाखांचे साहित्य लंपास

वाकी-महागड्या सीएनसी लेथ मशिनचा तब्बल बारा लाख रुपये किमतीचा कंट्रोलर डिसप्ले अज्ञात भामट्यांकडून लंपास करण्यात आल्याची विचित्र घटना चाकण उद्योग पंढरीतील कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीतील सॅनी हेवी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी याच कंपनीच्या मनुष्यबळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी मंगळवारी (दि. 29) अज्ञात भामट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॅनी हेवी या कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी संतोष रोहिदास महानवर (वय 32, रा. केरोफ शरदनगर, लेन 6, चिखली, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण औद्योगिक वसाहतीत कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीत सॅनी हेवी ही कंपनी असून या कंपनीत पोकलेनचे एक्‍सव्हेटरचा माल तयार केला जातो. या कंपनीच्या बिल्डींग नं. 8 मध्ये पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये सीएनसी लेथ मशिनचे कंट्रोलर डिस्प्ले मागील काही दिवसांपासून त्याचे काम नसल्यामुळे ठेवलेले होते. मात्र, कंपनीचे अधिकारी अचानक कंट्रोलर डिस्प्लेची तपासणी करत असताना कंपनीच्या पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये असलेले कंट्रोलर डिस्प्ले हे ठेवलेल्या जागी त्यांना मिळून आले नाही. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.
संबंधित बारा लाख रुपये किमतीचा महागडा कंट्रोलर डिप्ले कंपनीतूच कुणी कंपास केला की, बाहेरून आलेल्या अन्य कोणी चोरट्यांनी त्याची चोरी केली, हे अद्याप समजले नाही. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)