लेण्या येणार पर्यटनाच्या नकाशावर

– पुणे जिल्ह्यात 400 लेण्या
– मंत्रालयातील विशेष बैठकीतील निर्णय

पिंपरी – महाराष्ट्रात एकूण 1800 लेण्या असून, त्यापैकी 400 लेण्या एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. सांस्कृतिक वारसा असलेल्या या लेण्यांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी पर्यटन विभागाकडून कृती कार्यक्रम आखण्यात येईल, अशी माहिती आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली.

राज्यातील लेण्यांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासंदर्भात मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली. पर्यटनमंत्री रावल, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पर्यटन राज्यमंत्री मदन येरवार, आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, राज्यपर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन तसेच सांस्कृतिक खात्याचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील मावळ व जुन्नर तालुक्‍यात सुमारे 400 लेण्या असून कार्ले, भाजे, बेडसे या लेण्या वगळता शेकडो लेण्यांची माहिती, त्यांचा इतिहास त्यांचे ऐतिहासिक स्थान व सांस्कृतिक महत्व याची नागरिकांना माहिती नसल्याची बाब आमदार चाबुकस्वार यांनी उपस्थित सर्व मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या लेण्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाचे वैभव असून त्यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी पर्यटन खात्याने त्याचे ऐतिहासिक महत्त्व राज्यातील जनतेसमोर आणावे अशी आग्रही मागणी चाबुकस्वार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)