लेण्याद्री देवस्थानात विकासकामे सुरू

जुन्नर- लेण्याद्री देवस्थानचे काम उल्लेखनीय असून, येथील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार शरद सोनवणे यांनी दिली. लेण्याद्री येथील मलनिःसारण प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी येथील यात्रा निवास इमारतीच्या परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचेही भूमिपूजन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी सांगितले.भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्याबाबत देवस्थान कटिबद्ध असून भूमिपूजन झालेली सुमारे 1.10 कोटींची ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर यांनी सांगितले. याप्रसंगी गोळेगावच्या सरपंच शारदा लोखंडे, पोलीस पाटील कविता बिडवई, अलका माळी, दत्ता शिंदे, सचिन वाळूंज, राजेश बिडवई, देवस्थानचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सचिव रोहिदास बिडवई व कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
100 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)