लेखी आश्‍वासनानंतर प्रहारचे आंदोलन स्थगित

भावीनिमगाव – हिंगणगावने, खामगाव, जोहरापूर व शेवगाव तालुक्‍यातील वीजपुरवठा गेल्या एक महिन्यापासून विस्कळीत झाला होता. तो सुरळीत व्हावा, या मागणीसाठी तालुक्‍यातील शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वास दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चिंचवणे व नरके यांनी निवेदनाची दखल घेऊन तालुक्‍यातील विजेच्या प्रश्‍नासंबंधी तातडीने उपाययोजना तो मार्गी लावला जाईल, असे लेखी पत्र दिले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, इरफान काझी, सतीश पवार, संजय पवार, बन्सी पवार, स्वाभिमानीचे शहराध्यक्ष दत्ता भाऊ फुंदे, बाळासाहेब फटांगरे उपस्थित होते. त्यामुळे प्रहार संघटनेतर्फे करण्यात येणारे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)