लेखी आश्‍वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे

नेवासाफाटा- नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरात चालू असलेल्या भुयारी गटारांच्या निकृष्ट कामासंदर्भात त्रयस्थ संस्थेंच्या माध्यमातून अंतर्गत परिक्षणासाठी देण्यात आला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आल्याने नगर पंचायत कार्यालयासमोर चालू करण्यात आलेले अमरण उपोषण मागे घेण्यात आले.
शहरात चालू असलेल्या भुयारी गटारांची कामे अंदाजपत्रकातील सर्व नियम धाब्यावर बसवून बोगस पध्दतीने चालू आहे. याची चौकशी करण्याची मागणी केली होती. महिनाभरापुर्वी प्रशासनाला निवेदन देवूनही त्याची दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ नागरीकांनी नगर पंचायत चौकात अमरण उपोषण चालू केले होते. दिवसभर चालू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही. रात्री नगर पंचायतचे मुख्याधिकारी समिर शेख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात अशोक ताके, भाऊसाहेब वाघ, संजय शिंदे, अभिजीत मापारी, असीफ पठाण, विकास खराडकर, बालेंद्र पोतदार, कृष्णा राऊत, अशीष कावरे, जितु महाले, उमाकांत जामदार, अंकुष पंडुरे सहभागी झाले होते. शहरात चालू असलेल्या भुयारी गटारांच्या कामात मोठा गैरव्यवहार दर्जाहिन कामे चालू आहेत.
या कामांची वरिष्ठ पातळीवरून चौकषी होवून होणारी कामे दर्जेदार करण्याची मागणी केली होती. सदरची कामे घाई- घाई मध्ये पुर्ण करण्याचा सपाटा लावलेला आहे. प्रशासकीय यंत्रणा डोळ्या देखत दर्जाहीन काम होत असताना जबाबदार अधिकारी शांत बसलेले आहेत. शहरात काळी माती असताना देखील अंदाजपत्रकात कठीण मुरूम, काळा कठीण दगड, कच्चा दगड यांचे दर लावण्यात आलेले आहेत.
यावेळी किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल ताके, भाजपचे पोपट जिरे, संजय सुखदान, संदिप बहळे, कारभारी वाखुरे, लक्ष्मण जगताप उपस्थित होते.

या निकृष्ठ कामाचा अहवाल लवकर न मिळून त्यावर योग्य कारवाई होणे अपेक्षीत आहे परंतू तसे न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असून उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात कैफीयत मांडणार असल्याचे उपोषणकर्ते अभिजीत मापारी यांनी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)