लेखा विभागाला बंदोबस्त!

  • सुरक्षा वाढवली : बिले सादर करण्यासाठी ठेकेदारांची लगबग

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची विविध विकास कामे करणा-या ठेकेदार, पुरवठादारांची चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सर्व प्रकारची बिले 28 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत लेखा विभागाकडे पोहोचलीच पाहिजेत. 28 मार्चनंतर आलेली बिले कदापी स्वीकारली जाणार नाहीत, असा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. बिले सादर करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ठेकेदार-पुरवठादारांची बिले सादर करण्याची लगबग सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखा विभागाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

महापालिकेच्या विविध विभागामार्फत विकास कामे केली जातात. “मार्च एन्ड’ला सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांची बिले अदा केली जातात. ठेकेदार-पुरवठादारांनी केलेल्या कामांची बिले वेळेवर काढण्याची जबाबदारी लेखा विभागावर आहे. बील तयार करण्यापूर्वी उपअभियंता किंवा कनिष्ठ अभियंता, लेखाधिकारी यांनी ही बिले लेखा विभागात तपासणीकामी पाठविणे आवश्‍यक असते. मात्र, वेळोवेळी सूचना देऊनही त्याचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. त्यामुळे तेच आक्षेप पुन्हा उपस्थित होऊन लेखा विभागाकडून बिले परत पाठवली जातात.

बिले सादर करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने ठेकेदार आणि पुरवठदारांची बिले सादर करण्याची लगबग सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनूचित प्रकार होवू नये. या करीता लेखा विभागाला सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

अंतिम मुदत 28 मार्चपर्यंत…
गतवर्षी 31 मार्चनंतर ठेकेदारांची बिले स्वीकारली गेली नाहीत. सुमारे 160 कोटी रुपयांची बिले लेखा विभागाने रोखून धरली होती. सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी ठेकेदारांची बिले अडवून पठाणी वसूली केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. याबाबतची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर करण्यात आली होती. या तक्रारीमुळे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाची देशभर बदनामी झाली. या पार्श्वभूमीवर यंदा दोन महिने अगोदरपासूनच आयुक्तांनी दक्षता घेतली. प्रत्येक बिलासोबत ठेकेदारांनी त्या कामावर नियुक्त केलेल्या कर्मचा-यांची यादी आणि त्यांचा ‘पीएफ’ भरणा केल्याची चलने फाईलमध्ये समाविष्ट केल्यानंतरच उपअभियंत्याने बील देण्याची शिफारस करावी. ‘पीएफ’चा भरणा केला नसल्यास बील पूर्ततेसाठी पाठवू नये. अगोदर 23 मार्चपर्यंतच बीले स्वीकारली जातील, असे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. परंतु, राजकीय दबाव आल्यामुळे बीले सादर करण्याची अंतिम मुदत 28 मार्च रात्री बारापर्यंत वाढविण्यात आली आहे. A


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)