लेखा विभागाने केले हात वर

पिंपरी – महापालिकेच्या लेखा विभागाला सादर केल्या जाणाऱ्या विविध बिलांची सर्व विभागांनी रितसर पोहच पावती घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र, ही पोहच न घेतल्यास बीले काढण्यात विलंब झाल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर त्याची जबाबदारी राहणार असल्याचे सांगत लेखा विभागाने हात वर केले आहेत.

लेखा विभागाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकच्या लेखा विभागात महापालिकेच्या अन्य विभागांकडून पगार बीले, स्थायी अग्रीम बिले, अतिकालीन भत्ता, रजा प्रवास भत्ता, पुरवणी, फरक अशा विविध प्रकारचे बील मंजुरीसाठी पाठविली जातात. लेखा विभागातील लिपिक व मुख्य लिपिक कर्मचाऱ्यांकडे प्राप्त बिलांची तपासणीसाठी दिली जातात. मात्र ही बीले विलंबाने मंजूर होत असल्याच्या तक्रारी लेखा विभागाकडे प्राप्त होत आहेत. ही बाब लक्षात घेत, एका परिपत्रकाद्वारे लेखा विभागाने सर्व विभाग प्रमुखांना सूचना केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या कोणत्याही विभागामार्फत लेखा विभागाकडे सादर केल्या जाणाऱ्या विविध बिलांची स्वाक्षांकित पोच लेखा विभागातील बील तपासणी करणाऱ्या संबंधित लिपिक अथवा मुख्य लिपिक कर्मचाऱ्याकडून घेण्यात यावी. तसेच लेखा विभागातील कर्मचाऱ्याकडे बील दिल्याची पोच असल्याशिवाय बीले विलंबाने मिळाल्याची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

दरम्यान, या परिपत्रकामुळे महापालिकेच्या विविध विभाग प्रमुखांकडून पाठविली जाणारी बीले किमान सर्व खबरदारी घेऊन पाठविली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)