लेखा विभागाची “डोकेदुखी’

“मार्च अखेर’ची धास्ती : महिन्याभरात पाच हजार बिले दाखल

पिंपरी – कोणत्याही विकास कामांची बिले 31 मार्चनंतर स्वीकारली जाणार नाहीत, असा सक्त आदेश काढल्याने याच्या धास्तीपोटी ठेकेदारांकडून वेळीच बिले दाखल केली जात आहेत. मार्चअखेरची मुदत दिल्याने चालू महिन्यात आजअखेर एकूण 4 हजार 822 बिले लेखा विभागात दाखल झाली आहेत. सलग दोन ते तीन दिवस सुट्ट्या लागून आल्याने बुधवारी (दि. 28) ठेकेदारांनी सर्वाधिक बिले करून घेतली. दिवसभरात 1 हजार 168 बिले दाखल करून घेण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना 31 मार्चनंतरही मुदतबाह्य बिले स्वीकारली जात होती. त्यामुळे ठेकेदार मार्चनंतर झालेल्या कामाची बिले 31 मार्चपूर्वीची तारिख नोंदवून लेखा विभागात सादर करत होते. त्याला पायबंध घालण्यासाठी लेखा विभागाचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी गेल्या वर्षी 31 मार्चनंतर एकही बिल स्वीकारले जाणार नाही, असे आदेश सर्व विभागाला दिले होते. तरीही, ठेकेदारांनी 31 मार्चनंतर बिले सादर करून घेण्यास लेखा विभागावर दबाव वाढवला. मात्र, लेखा विभाग आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यावर चालू वर्षात देखील तसाच आदेश लेखा विभागाने काढला होता. त्यानुसार सर्व विभागांतर्गत झालेल्या विकास कामांची बिले 31 मार्चपूर्वी दाखल केली जात आहेत. चालू वर्षात महसुली व भांडवली अशा दोन्ही प्रकारातील 26 हजार 167 बिले लेखा विभागाने दाखल करून घेतली. तर, मार्च महिन्यामध्ये 4 हजार 822 बिले आज बुधवार (दि. 28) अखेर दाखल करून घेतली आहेत. तर, बुधवारी दिवसभरात 1 हजार 168 बिले दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी सांगितली.

महापालिकेच्या 2017-18 या आर्थिक वर्षातील एकूण बिलापोटी 1976 कोटींची बिले अदा करण्यात आली आहेत. त्यामध्ये महसुली 1 हजार 260 तर, भांडवली 645 बिलांचा समावेश आहे. सलग दोन ते तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने ठेकेदारांकडे बिले भरण्यासाठी अत्यंत कमी वेळ आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या सर्वाधिक फाईली बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल केल्या गेल्या. 31 मार्चच्यानंतर एकही फाईल दाखल करून घेणार नाही, अशी माहिती लांडे यांनी सांगितली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)