लेखापरीक्षणात तंत्रज्ञान वापरावे : कोविंद 

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी नवी दिल्लीत 29 व्या महालेखापाल परिषदेचे उद्‌घाटन केले. उत्तरदायित्व आणि सुशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी काय करायला हवे याबाबत आत्मपरीक्षण आणि चर्चा करण्याची ही महालेखापाल परिषद उत्तम संधी असल्याचे ते म्हणाले.
डिजिटल युगातील लेखापरीक्षण आणि लेखा ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. कॅग आपल्या लेखापरीक्षणात माहिती विश्‍लेषणाचा अधिकाधिक वापर करत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. लेखापरीक्षण म्हणजे कार्य समाप्ती नव्हे तर सरकारला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)