मुंबई: माजी सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांच्यावरील एसआरए घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी, आता सीआयडीमार्फत करण्यात येणार आहे. याप्रकरणातील 137 पैकी  33 फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झाले  असल्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सांगितले.परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास पाटील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ झाली आहे, अशी धक्कादायक माहिती रवींद्र वायकर यांनी दिली.

याबाबत  निर्मलनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. याप्रकरणाची सीबीआय, सीआयडी किंवा एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्ती आधी SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या कार्यालयात अक्षरशः धुमाकूळ घालत विकासकांना हव्या तशा मंजुऱ्या दिल्याचा ठपका, चौकशी समितीने ठेवला आहे.

पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने यापूर्वी पाटील यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर या समितीला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या समितीने आपल्या अहवालात विश्वास पाटील यांनी जूनमध्ये निवृत्तीआधी घातलेला धुमाकूळ स्पष्टपणे मांडण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)