लेखकच सिनेमाचा खरा हिरो – सोनम कपूर

सिनेमामध्ये अॅक्‍टर-अॅक्‍ट्रेस कितीही चांगले असले तरी कथेमध्ये दम असेल, तरच सिनेमा हिट होऊ शकतो. त्यामुळे सिनेमाचे खरे यश हे लेखकावरच अवलंबून असते, असे मत सोनम कपूरने व्यक्‍त केले आहे. लेखकांना सिनेमाच्या यशामध्ये सर्वांत महत्वाचे स्थान असते. त्यामुळे त्यांना त्या यशाचे श्रेयही मिळायलाच पाहिजे, असा तिचा आग्रह आहे.

सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळातच जेन ऑस्टिनची कादंबरी “एम्मा’च्या कथेवर आधारित “आयशा’चा रोल तिला मिळाला होता. त्यामुळे चांगल्या पुस्तकांवर आधारित सिनेमांमध्येच काम करण्याकडे तिचा कल सातत्याने राहिला आहे.

लेखक हाच सिनेमाचा रॉकस्टार असतो. सर्वसाधारणपणे सिनेमातील तंत्रज्ञांना त्यांचे योग्य श्रेय दिले जात नाही. कॅमेऱ्याच्या पाठिमागे असलेल्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच आहे. मात्र, त्या सिनेमाचा आत्मा असलेल्या कथेला आणि कथेच्या लेखकाकडे तरी दुर्लक्ष होणे योग्य नाही. त्या लेखकाला त्याचे श्रेय मिळालेच पाहिजे, असे ती म्हणाली.

चांगले साहित्य पडद्यावर सिनेमाच्या स्वरूपात आणण्यासाठी स्वतः सोनम आता प्रयत्न करणार आहे. तिची प्रोड्युसर बहीण रिया कपूरबरोबर मिळून तिने “बॅटल फॉर बिट्टोरा’ आणि “गोविंदा’ या पुस्तकांचे हक्क तिने विकत घेतले आहेत. यथावकाश तिला या सिनेमांच्या निर्मितीबाबतही निर्णय घ्यायचा आहे. याशिवाय ट्विंकल खन्नाने लिहीलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशनही सोनम कपूरच्या हस्ते होणार आहे. ‘पजामाज आर फोरगिव्हिंग’ असे या पुस्तकाचे नाव आहे. ट्विंकलने लिहीलेले हे तिसरे पुस्तक असणार आहे. नुसती एन्टरटेमेंट करणाऱ्या सिनेमांपेक्षा समाजाला काही तरी मौलिक संदेश देणाऱ्या सिनेमांमध्ये काम करायला आपल्याला अधिक आवडेल, असेही तिने सांगितले.

सोनमला बॉलिवूडमध्ये येऊन नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. याकाळात ज्या डायरेक्‍टरबरोबर काम करण्याची संधी मिळाली ते सगळे जण चांगल्या साहित्याचे अभ्यासक होते. त्यामुळे आतापर्यंत तरी फ्लॉप सिनेमाची हिरोईन असा शिक्का बसला नसल्याबद्दल तिला समाधान वाटते आहे. सोनम सध्या “द झोया फॅक्‍टर’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)