“लेक शिकवा’ अभियानावर समाजप्रबोधन

आंबेगावच्या आदिवासी भागात जिजाऊ, विवेकानंद जयंती साजरी

अवसरी -आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागातील तिरपाड, भागीतवाडी, निगडाळे, पोखरी, राजपूर, तळेघर आदी जिल्हा परिषद प्राथमिक, उच्च माध्यमिक व शासकीय आश्रमशाळांत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले आदी विविध वेशभूषा केल्या होत्या. याप्रसंगी ‘लेक शिकवा’ अभियानावर समाजप्रबोधन करण्यात आले.
तिरपाड ः
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबुराव दांगट, मुख्याध्यापिका जयश्री गडगे, शिक्षक काळू शेखरे, खंडू येवले, सोमनाथ लोहकरे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेमध्ये शिक्षणाचे महत्त्व विशद करणारी घोषवाक्‍य स्पर्धा, गीत गायन झाले. इयत्ता सातवीतील अपेक्षा साळवे ही बालसभेच्या अध्यक्षस्थानी होती. मुख्याध्यापिका जयश्री गडगे, खंडू येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी करन घोईरत यांनी केले तर विशाल दांगट यांनी आभार मानले.
भागीतवाडी ः
येथील शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती उंडे, उपसरपंच सचिन भागीत, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल वाघमारे, अशोक लांघी, सुरेश भालेराव, चंदर कोळप, रुख्मिणी भागीत, विठ्ठल भागीत उपस्थित होते. यावेळी उपसरपंच सचिन भागीत, मुख्याध्यापक मंगेश बुरुड, विजय दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी अर्षद बेंढारी, शिवम भालेराव, अपेक्षा करवंदे यांची भाषणे झाली. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मायभूमी विकास परिवार पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दरेकर, शाम आगळे, वैशाली आगळे यांच्या वतीने मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बुरुड तर सविंद्रा कोळप यांनी आभार मानले.
निगडाळे ः
येथील शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष थोरात, शिक्षिका अलका गुंजाळ, अंगणवाडी सेविका नंदा लोहकरे, सुनिल लोहकरे उपस्थित होते. विद्यार्थी साहिल लोहकरे, मयूर लोहकरे, प्रतिक कुऱ्हाडे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी श्रेया लोहकरे या विद्यार्थीनीने राजमाता जिजाऊ व कुणाल भवारी या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंदांची वेशभूषा केली होती. यावेळी राजमाता जिजाऊ चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका गुंजाळ यांनी केले तर आभार संतोष थोरात यांनी मानले. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
राजपूर ः
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे मुख्याध्यापक आर. के दोडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिक्षिका एस. बी सातपुते, ए. व्ही जाधव, टी. आर. बोऱ्हाडे, एस. एल. ढमढेरे, बी. के. खेडकर, आर. व्ही. भागवत, सुनील शिंदे, भागवत भंगे, व्ही. वाय. साखरे, डी. आर. गव्हाणे व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, बाल शिवबा आदी वेशभूषा केल्या होत्या. पोखरी शाळेत शिक्षक नवनाथ गाडेकर, सुभाष लिंगे. इष्टेवाडी शाळेत शिक्षक लुमा आंबेकर, संतोष भवारी. बेंढारवाडी येथे बाळासाहेब राऊत व बाळासाहेब इंदौरे व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)