लुल्लानगर नियोजित उड्डाणपूलाजवळील अंडरबायपास : शिरोळे यांनी दिले खासदार निधीतून एक कोटी रुपये

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 28 – कोंढवा खुर्द येथील लुल्लानगर चौक येथील प्रस्तावित उड्डाणपूलाजवळील अंडर बायपाससाठी खासदार अनिल शिरोळे यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध करून दिला आहे.
या पुलाच्या एचएम (सीटीसी) प्रवेश ते न्यू कमांड हॉस्पिटल या ठिकाणी अंडरपास बांधण्यात येणार आहे. यासाठी निधीची आवश्‍यकता असल्याने शिरोळे यांनी खासदार स्थानिक विकास निधि अंतर्गत एक कोटी रुपये दिले आहेत.
या नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी एकूण चार कोटी 48 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी एक कोटी रुपयांचा निधी महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे.
तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उर्वरित रक्कमेची तरतूद ही खासदार आणि आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून उभी करावयाची असल्याने त्यानुसार हा निधी उपलब्ध करून दिल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)