लुटमार करणारी टोळीतील तिघांना बेड्या

भवानीनगर- इंदापूर पोलीस हद्दीत दुचाकीवरून आलेल्या पाच जणांच्या जणांनी टेंपोस अडवून चालकाच्या गळ्याला तलावर लाऊन त्याच्याजवळील 52 हजार व टेंपोची चावी घेऊन पळून गेलेल्या आरोपींपैकी तीघांना जेरबंद केले आहे. गुन्हे शोध पथक उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती आणि अपर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नितीन उर्फ काळ्या बाळू उर्फ भारत चव्हाण, दिनेश क्षीरसागर उर्फ डी.के. दोघे रा. (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर) असे जेरबंद करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर सोमनाथ उर्फ सोम्या लाला राऊत, धनाजी उर्फ एमड्या मोरे (दोघे रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) असे फरार असलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने अपर पोलीस अधीक्षक बारामती व उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्यावेळी खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की, हा गुन्हा नितीनने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केला आहे. तसेच तो उसाची गाडी नीरा-भीमा साखर कारखाना येथे खाली करण्यासाठी येणार असल्याचे समजले. त्यावेळी तेथे सापळा लावून त्यास ताब्यात घेतले व त्याने वरील गुन्ह्याची माहिती घेतली असता त्याने सोमनाथ, धनाजी, सचिन, दिनेश यांच्यासह गुन्हे केल्याचे काबुल केले. त्यानंतर दिनेश व सचिनला ताब्यात घेतले. दरम्यान, इतर दोघे फरार आहेत. ही कामगिरी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवलादर शिवाजी निकम, संजय जगदाळे, संदिप मोकाशी, सुरेंद्र वाघ, पोलीस नाईक संदिप जाधव, संदिप कारंडे, अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, रॉकी देवकाते, पोलीस कॉस्टेबल शर्मा पवार, विशाल जावळे, दशरथ कोळेकर, सदाशिव बंडगर यांनी केली. दरम्यान, यातील पाचही आरोपी सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)