लुईस सुआरेझ 2 आठवडे मैदानाबाहेर 

बार्सिलोना: एफसी बार्सिलोना संघाचा स्टार खेळाडू लुईस सुआरेझ हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. अटलाटिको माद्रीद विरुद्धचा सामना पूर्ण खेळल्यानंतर दुखापतीच्या उपचारासाठी पुढील दोन अठवडे तो मैदानाबाहेर राहणार आहे. पीएसव्ही विरुद्ध होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यासाठीच्या संभाव्या संघात त्याचे नाव सामील केले गेले नाही.

त्यानंतर ही माहिती मिळाली. तो 8 डिसेंबरला ला लिगा मधील सामन्यात इस्पॅनीओल विरुद्ध आपले पुनरागमन करू शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. राफिनाहा, सर्जी रॉबेर्टो, थॉमस वर्मालियन, सर्जी सॅमपर आणि ऑर्थर हे खेळाडू अगोदरच जायबंदी आहेत. फलिप कोटिन्हो आणि इवान रॅकिटीक हे खेळाडू दुखापतीतून बरे होऊन पुढील सामन्यात पुनरागमन करतील त्यामुळे बार्सिलोना संघाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)